खारेपाटण केंद्र शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा
*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा खारेपाटण नं.१ या शाळेत नुकताच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीचे औचित्य साधून बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम.अर्चना तळगावकर, संजय राऊळ, सहायक शिक्षिका श्रीम.स्मिता कोरगावकर,श्रीम.अलका मोरे, श्रीम.रेखा लांघी, श्रीम.रुपाली पारकर,अंगणवाडी सेविका श्रीम मोहिरे आदी मान्यवर उपस्थित होते….
