प्रवासी किरकोळ जखमी मात्र कारचे नुकसान….
*⚡सावंतवाडी ता.०४-:* वॅगनार गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मळगाव घाटात माया हॉटेल नजिक वळणावर अपघात झाला आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात गाडीचे नुकसान झाले असून, गाडीतील प्रवासी किरकोळ जख्मी झाले आहेत. या प्रवाश्यांना तेथील स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
