वेंगुर्ला
वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गावरील आडेली खुटवळवाडी कार्यक्षेत्रातील स्ट्रीटलाईट्स मागील बऱ्याच कालावधीपासून बंदावस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ यांनी वेंगुर्ला पंचायत समिती अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही याकडे अद्याप लक्ष पुरविण्यात न आल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत स्थानिक नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याच मार्गावर वेतोरे कुडाळसडा – आडेली – वजराट असा वन्यप्राण्यांचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. याबाबतीत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून करण्यात आली आहे. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य रस्ता दुतर्फा आडेली मठ व अन्य कार्यक्षेत्रातील वाढलेले गवत वाहनधारकांना त्रासदायक ठरत असून अपघातास आमंत्रण देत आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

