Headlines

वजराट पिंपळगाव रस्ता नूतनीकरणाची मागणी

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वजराट श्री गिरेश्वर सातेरी मंदिर ते पिंपळगाव कडे जाणाऱ्या रस्त्याची लेवल पूर्णतः खराब झाली असून संबंधित भागाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी सर्वच वाहनधारकांकडून संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान वजराट पिंपळगाव प्राथमिक शाळेनजीक मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून आडेलीकडे येणाऱ्या रस्त्याची लेवलही बऱ्याच ठिकाणी खराब झाली आहे. याच मार्गदुतर्फा मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने गोव्याकडे कामानिमित्त जाणाऱ्या युवकांना, अन्य वाहनधारकांना याचा मोठा त्रास होत आहे. तसेच वजराट तिठा ते मुख्य गावाकडे जाणाऱ्या रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून याकडेही प्राधान्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page