वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील मठ श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजन, केळी – नारळ ठेवणे, माहेरवाशीणी ओटी भरणे, रात्री पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर खानोलकर दशावतार नाट्यकंपनीचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी व देवस्थान उपसमिती मार्फत करण्यात आले आहे.

