
मळेवाड-कोंडुरे येथील शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला…!
सावंतवाडी ता.०६-: तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथील शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात ४ शेतकरी गंभीर जखमी केले….
सावंतवाडी ता.०६-: तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथील शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात ४ शेतकरी गंभीर जखमी केले. मळेवाड प्राथमिक उपकेंद्रात प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी उपवनसंरक्षक, वनविभाग कर्मचारी, पोलिस दाखल झाले आहेत. मळेवाड येथील बिबट्याच्या हल्ल्यात प्रभाकर राऊळ, सुर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आनंद न्हावी हे चार शेतकरी गंभीर जखमी झाले. अधिक उपचारासाठी…
महसूल विभागाच्या अन्यायविरोधात चौकशीची मागणी.. ⚡आंबोली ता.०५-: नियमाप्रमाणे प्रामाणिक काम करत असताना महसूल आकसाने कारवाई करत वेतन थांबवून अन्यायी कारवाई केल्याने प्रशासनाविरोधात १० तारिखला जिल्हापरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा तलाठी सुमित घाडीगावकर यांनी दिला आहे. आंबोली सजाचे तलाठी सुमित घाडीगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आंबोली आणि गेळे (ता. सावंतवाडी) येथील ग्रामस्थांकडून तलाठी श्री….
⚡मालवण ता.०६-:अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ.दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या प्रशालेत ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत मालवण मधील करवंटी कलाकार तथा पत्रकार भूषण मेतर यांचा नारळाच्या करवंटीपासून वस्तू बनविणे या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भूषण मेतर यांनी विद्यार्थ्यांना करवंटी पासून विविध वस्तू बनविण्याची प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. देवबाग हायस्कुलच्या सभागृहात…
कणकवली : आनंददायी शनिवार अंतर्गत आषाढी एकादशीच्या औचित्याने जि. प. शाळा आशिये व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी उपक्रम साजरा केला.यावेळी आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. विठ्ठल – रखुमाई ची वेशभूषा मुलांनी साकारली. मुलांनी वारकरी संप्रदायातील पोशाखात सहभागी होत वारीचे वातावरण निर्माण केले. शाळेत सुंदर पालखी सजवण्यात आली होती….
मोहिनी मडगावकर यांचा आरोप: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच वेधले निवेदनद्वारे लक्ष.. सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर कटरने फाडल्याचा आरोप भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केला. याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे लक्ष वेधलं. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अज्ञाताचा शोध घेण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षकांनी दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या अभिनंदनाचे बॅनर…
तात्काळ सुरू न केल्यास उड्डाण पुलावरील वाहतूक रोखणार; तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांचा इशारा.. ⚡बांदा ता.०६-: कामे अपूर्णावस्थेत असतानाही मोठा गाजावाजा करत सत्ताधाऱ्यांनी घाई गडबडीत उद्घाटन केलेल्या येथील उड्डाणपुलावरील पथदिवे अद्यापही सुरू नसल्याने या ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालकांना पावसात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने हे उड्डाणपूल अपघातांना निमंत्रण देणारे ठरत असल्याचा आरोप मनसेचे सावंतवाडी…
⚡बांदा ता.०६-:प. पू. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज स्थापित श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे गुरुवार दिनांक १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ ते १.३० वाजता आरती आणि होमहवन, दुपारी १. ३० ते सायंकाळी ४ पर्यंत महाप्रसाद भंडारा, संध्याकाळी ४ ते ८…
दिव्य ज्योती:प्रशाळेची शिक्षक पालक सभा शाळेच्या सभागृहात संपन्न.. ⚡बांदा ता.०६-: दिव्यज्योती प्रशाला नावाप्रमाणेच दिव्यत्वाच्या ज्ञानरूपी ज्योतीने विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या प्रकाशवाटा दाखवत आहे. विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर, इंजिनियर बनवून पैसा कामवायला शिकवणे हे आमचे ध्येय नव्हे, तर एक माणूस म्हणून प्रत्येक विद्यार्थी घडावा, मानवता, परस्पर सहकार्य आदी मूल्यांची रूजवण योग्य वयात त्यांच्या मनावर व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील…
⚡बांदा ता.०६-: बांदा शहरातील ग्राहकांच्या विजेच्या समस्या कर्तव्यदक्ष राहून तात्काळ सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे महावितरणचे वायरमन अमित वाघाटे यांची बढती लाईनमन म्हणून कणकवली येथे झाली आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कविटकर, भाजपा…
⚡बांदा ता.०६-:आषाढी एकादशीचे औचित्य साधून जि . प. प्रा. शाळा मडुरे नं ३ तर्फे चिमुकल्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली. प्रशालेपासून बाबरवाडी कुळकार मंदिरापर्यंत टाळ व विठ्ठल नामघोषात लक्षवेधी दिंडी संपन्न झाली. या दिंडीत गौरेश प्रविण धुरी याने विठ्ठलाची तर रितीशा अमित धुरी हिने रुक्मिणीची वेशभूषा केली होती. सर्व लहान मुलीनी नऊवार साडी नेसून डोक्यावर तुळशी…