भजनाच्या माध्यमातून घरोघरी भक्तीचा जागर…!

⚡वेंगुर्ला ता.२९-: गणेशोत्सवाच्यानिमित्ताने गावापासून ते शहरापर्यंत सर्वत्र भजनाच्या माध्यमातून भक्तीचा जागर सुरू झाला आहे. गेले काही दिवस या भजनी मंडळांची रंगीत तालिम सुरू होती. नवनविन अभंग, गजर, गौळण अशाप्रकारची रचना एका सुरात, एका तालात बसविण्यासाठी मंडळतील सर्वचजण मेहनत घेत होते. आता प्रत्यक्ष भजनाला सुरूवात झाली असून सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत ही भजनसेवा घरोघरी सादर केली जात आहे. कोकणात अलिकडे एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालत असली तरी सणासुदीच्या निमित्ताने प्रत्येकजण एकत्र येऊन आनंदाने सणउत्सव साजरा करीत असतात. त्यामुळे काही घरांमध्ये सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे.

You cannot copy content of this page