⚡सावंतवाडी ता.२९-: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मळगाव गावामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) सावंतवाडी उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांनी गावातील विविध घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन भक्तांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी पार्सेकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य व संस्कृती जपणारा सण असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी केलेल्या आकर्षक सजावटीचे त्यांनी कौतुक केले.
गणपती बाप्पाच्या चरणी त्यांनी मळगाव गावाच्या सुख-समृद्धीची व सर्वांच्या आरोग्य व कल्याणाची प्रार्थना केली. या भेटीमुळे गावातील गणेशोत्सवाच्या उत्साहात अधिक भर पडली आहे