कविलकाटे येथील ग्रीन झोन काढा…

समिल जळवी यांचे कुडाळ न.प. मुख्यधिकारी यांना निवेदन..

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे. सदरचा झोन काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायातचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. याचा शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करून ग्रीन झोन काढण्यासाठी मागणी केली.
गेले कित्तेक वर्षे कुडाळ शहरातील नगरपंच्यायत हद्दीतील कविलकाटे १ नंबर वॉर्ड मधील शेतकरी आणि नागरीकांची प्रमुख्याने आग्रहाची मागणी अशी आहे कि, “आमच्या कविलकाटे येथील जमिनीवरील ग्रीन झोन ऊठवावा “. कविलकाटे या महसूली गावात लोकांच्या जवळपास 60% जमिनीवर ग्रीन झोन खाली लागलेला आहे आणि हा ग्रीन झोन सध्याच्या स्थितीत येथील नागरिकांची गंभीर बाब आहे. हा ग्रीन झोन लागल्यामुळे गावातील लोकांना घर बांधणी करणे, घर दुरुस्ती करणे, घरापर्यंत वीज नेणे तसेच घरासाठी बँकेकडून लोन घेणे, नवीन घरासाठी घर नंबर घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे यातील कोणत्याच प्रक्रियेत कविलकाटे येथील नागरिकांना सहभाग घेता येत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी, तसेच नागरिक या ग्रीन झोनला त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याच विषयावर कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायतचे मुख्याधिकारी विनायक ओंधकर यांना लेखी निवेदन देत लक्ष वेधले आहे.

You cannot copy content of this page