Headlines

तुळस येथे ‘दीपावली शो टाईम पर्व तिसरे’ उत्साहात…

संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन:यशवंत उर्फ बाळू परब मित्रमंडळ आणि आरसीसी देऊळवाडा-तुळसचा उपक्रम..

⚡वेंगुर्ले ता.१४-: यशवंत उर्फ बाळू परब मित्रमंडळ आणि आरसीसी देऊळवाडा-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपावली शो टाईम पर्व तिसरे’ या कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी, उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, यशवंत उर्फ बाळू परब, दीपेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपावलीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page