वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वजराट देवसू, होडावडा, पेंडूर गावात दाखल झाल्यानंतर ” ओंकार ” हत्ती शनिवारी तळवडे गावात दाखल झाला आहे. यावेळी ठिकठिकाणी त्याचे नागरिकांतून स्वागत करण्यात आले. ओंकार ची वनविभाग व आरआटी टीमद्वारे योग्यप्रकारे काळजी घेण्यात येत असल्याने व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य कार्य करण्यात येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी वेंगुर्ला वनपाल संजय हजारे, वनरक्षक प्रवीण कमळकर, वनरक्षक ब्रम्हकुमार भोजने, वनमजूर इब्रामपुरकर, पाडावे तसेच कुडाळ, सावंतवाडी आरआरटी टीम पथक कार्यरत आहेत. तुलनेत नुकसान न करता ओंकार हत्ती सिंधुदुर्गात स्थिरावल्याने नागरिकांत अधिकचा उत्साह जाणवून येत आहे.

