कुडाळ : कुडाळ-नाबरवाडी येथील रहिवासी आणि कुडाळ मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मिलिंद पांडुरंग देसाई (वय ६४) यांचे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोवा बांबुळी येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
गेले काही महिने ते आजारी होते. त्यांनी कुडाळ तालुका कार्यवाह तसेच जिल्हा प्रचार विभाग प्रमुख या जबाबदाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पार पाडल्या. तसेच त्यांच्या वृत्तपत्र विक्रीच्या स्टॉल वरून सर्वांनाच अडीअडचणीच्या वेळी त्यांनी मदत केली. कोरोनाच्या काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. कोणालाही रक्त लागल्यास ते रक्तदाता तात्काळ उपलब्ध करून देत असत. अनेक मुलांना, तरुणांना त्यांनी ताशा आणि ढोल वादनाचे धडे दिले होते. अयोध्येत देखील कारसेवक म्हणून ते गेले होते.
त्यांच्या निधनाने कुडाळ शहरातील सामाजिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या (१५) सकाळी साडेनऊ वाजता नाबरवाडी येथील निवासस्थानातून निघेल.

