वेंगुर्ला
गेली 14 वर्षे सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या शिरोडा येथील सिद्धेश (भाई) परब मित्रमंडळाच्या वतीने पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी फळे, बिस्कीट व पाणी वाटपाचा कार्यक्रम शिरोडा येथे पार पडला.
आषाढी एकादशीनिमित्त वेंगुर्ला तालुक्यातून व शिरोडा गावातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. त्यांच्या प्रवासात त्यांना दिलासा मिळावा यासाठी मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही फळांसोबत बिस्कीट व पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा वेंगुर्ला पं. स. माजी उपसभापती सिद्धेश परब यांनी सर्व वारकऱ्यांना सुखरूप यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे वारकरी बांधवांनी स्वागत केले.यावेळी शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, प्रथमेश परब, कृष्णा आचरेकर, वैभव मांजरेकर, समीर आचरेकर, आनंद गोडकर, गौरव राऊत, भाऊ गोडकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

