Headlines

Global Maharashtra Breaking News

“सिंधुदुर्गच्या राजा” समोर रंगली अस्सल मालवणी फुगडी”…

कालवीबंदरच्या श्री विठ्ठल रखुमाई फुगडी गृपच्या महिलांनी फुगडीचे अप्रतिम केले सादरीकरण.. ⚡सिंधुदुर्ग दि.०७-: केळूस-कालवीबंदर येथील कु.दिव्या खवणेकर हिच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री विठ्ठल रखुमाई महिला गृप फुगडीतील महिलांनी कुडाळ येथील “सिंधुदुर्ग राजा”च्या दरबारात फुगडीचे अप्रतिम सादरीकरण केले. कोकणातील फुगडीची परंपरा शेकडो वर्षे सुरू असून, जिल्हाभरातून आलेल्या विविध महिलांनी सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात फुगडयांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही सादरीकरण…

Read Full News

देवली गावात लोकसहभागातून १० वनराई बंधारे पूर्ण

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम ⚡मालवण ता.०७-:कमी पावसामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी वाहून जाणारे पाणी हे वनराई बंधाऱ्यांमुळे अडवून जमिनीत मुरण्यास मदत होणार आहेच शिवाय भूजल पातळी वाढून ऐन उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, असे प्रतिपादन देवली गावचे सरपंच श्री. श्याम वाक्कर यांनी येथे बोलताना केले. आगामी…

Read Full News

पोषण आहार स्वयंपाकींच्या थकीत मानधनासाठी कुडाळात शिक्षक समितीचे आंदोलन…

चार महिन्यांचे मानधन तातडीने देण्याची मागणी:सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली दखल.. ⚡कुडाळ ता.०७-: शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीसांचे प्रलंबित मानधन तसेच शिक्षकांच्या विविध आर्थिक, सेवाविषयक आणि शैक्षणिक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कुडाळच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी कुडाळ पंचायत समितीसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील ग्रामीण…

Read Full News

कुडाळ महाविद्यालयात अभिजात अभिवाचन उत्साहात…

औचित्य मराठी भाषा वर्धापन दिनाचे: दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.०७-: येथील क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा वर्धापन दिनानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी अभिवाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मराठी भाषेचा अभिजात वारसा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध साहित्यकृतींची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे या…

Read Full News

‘आमची बालके, आमची जबाबदारी’

कुडाळमध्ये पोषण आहार जनजागृती रॅली उत्साहात:बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासाचा संदेश.. ⚡कुडाळ ता.०७-: लहान मुलांचे योग्य पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प, कुडाळ यांच्या वतीने ‘पोषण माह’ अभियानांतर्गत कुडाळ शहरात पोषण आहार जनजागृती रॅली उत्साहात काढण्यात आली.‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित या रॅलीतून…

Read Full News

आरोग्य, पैसा आणि वेळेची बचत करण्यासाठी मध्यस्थी हाच राजमार्ग…

कुडाळ न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम:नागरिकांना मध्यस्थी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.०७-: वाढत्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये तडजोडीने आणि जलदगतीने वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी हा प्रभावी मार्ग असून, त्यातून आरोग्य, पैसा आणि वेळेची मोठी बचत होऊ शकते, असे प्रतिपादन कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांनी केले.कुडाळ येथील दिवाणी न्यायालय…

Read Full News

व्यसनांपासून दूर राहा, करियरवर लक्ष केंद्रित करा !

पुष्पसेन ज्ञानपिठात व्यसनमुक्तीवर समाजकल्याण विभागाकडुन व्याख्यान कुडाळ :सेवा संकल्प अभियानांतर्गत सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय , सिंधुदुर्ग यांच्या वतीने वाडी हुमरमळा येथील श्री पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयात ‘व्यसनमुक्त भारत’ या विषयावर जागृकता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तरूणांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्य, शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य…

Read Full News

फसवणूक आणि सायबर क्राईमपासून बचावासाठी ग्राहकांनी सतर्क राहावे…

दीपक टी.व्ही.:बँक ऑफ इंडियाचा नेरूर माड्याचीवाडी येथे जनजागृती उपक्रम.. कुडाळ ता. वाढत्या फसवणुकीच्या आणि सायबर क्राईमच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी अधिक सतर्क आणि जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी दीपक टी. व्ही. यांनी केले.बँक ऑफ इंडिया, कुडाळ शाखेच्या वतीने आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी नेरूर माड्याचीवाडी येथील जिल्हा…

Read Full News

कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना ४८ तासांत खुलासा करण्याची नोटीस…

विविध तक्रारीवरून जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी विभाग नियंत्रकांना धरले धारेवर.. ⚡कुडाळ ता.०७-: कुडाळ आगारातील विविध तक्रारी आणि महिला प्रवाशांशी कथित उर्मट वर्तनाच्या मुद्द्यावरून बुधवारी आगारात चांगलाच गदारोळ झाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्या दीप्ती पडते, माजी जिल्हा परिषद सदस्या आना भोगले, शिवसेना पदाधिकारी प्राजक्त चव्हाण आणि भाजप प्रदेश सहसंयोजक निलेश…

Read Full News

२० ते २५ दिवसांपासून फरार भारत लाखे पोलिसांना शरण…

उद्या न्यायालयात हजर करणार: पोलिसांची माहिती.. सावंतवाडी : नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गहाळ झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा असलेले पालिकेचे जोडारी भारत लाखे हे आज स्वतःहून सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर झालेत. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. गेले २० ते २५ दिवस फरार होते‌. सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात १७ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर…

Read Full News

You cannot copy content of this page