विशाल परब: महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार दीपक गवस यांना बहुमताने निवडून द्या..
⚡दोडामार्ग ता.०३-: जोपर्यंत रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही, असे ठाम मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. आज या भागात अनेक मूलभूत समस्या असून, विशेषतः रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात रोजगाराच्या संधींचा अभाव असल्याने येथील अनेक तरुण रोजगारासाठी गोव्याच्या दिशेने स्थलांतर करत असल्याची खंत विशाल परब यांनी व्यक्त केली. हे चित्र पाहून आम्हाला वेदना होतात, असे सांगत या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तरुण, तडफदार व सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुण नेतृत्व दीपक गवस यांच्यासारख्या उमेदवाराला मतदारांनी बहुमताने निवडून दिल्यास, रोजगारासह इतर सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. दीपक गवस यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
ते दोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते.
