वायंगणी ज्ञानदीप हायस्कुल येथे ५ रोजी काकासाहेब आसोलकर स्मृतिदिन व पारितोषिक वितरण समारंभ…

⚡मालवण ता.०३-:
वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.काकासाहेब आसोलकर यांचा २४ वा स्मृतिदिन अर्थात ज्ञानदीप संस्थेचा संकल्प दिन व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरूवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी येथे संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम ज्ञानदीप संस्था अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी श्याम चव्हाण व वायंगणी सरपंच श्री. रूपेश पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमासं उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक दगडू टकले, शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर, संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी केले आहे.

You cannot copy content of this page