मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप…

⚡मालवण ता.०३-:
शैक्षणिक विश्वात दहावी आणि बारावी च्या परीक्षांना महत्त्वाचे स्थान दिले गेल्याने आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आज विद्यार्थी उभे असून दहावी आणि बारावी या केवळ परीक्षा नसून, तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणारे मैलाचे दगड आहेत असे प्रतिपादन मालवणचे सुपुत्र आणि मातृत्व आधार फाउंडेशनचे सल्लागार श्री सागर वाडकर यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन च्या वतीने मालवण शहरातील भंडारी ए सो हायस्कूल तसेच इतर शाळांमधील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शालोपयोगी साहित्याची किट प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री एच बी तिवले, दादा वेंगुर्लेकर, प्रा रामचंद्र काटकर, संजय हंजणकर, जगदीश तोडणकर पर्यवेक्षक आर डी बनसोडे संजय दत्ताराम लुडबे दिक्षा लुडबे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले

यावेळी संतोष लुडबे यांनी यश म्हणजे फक्त जास्त गुण मिळवणे एवढेच नसते. यश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून, सातत्याने प्रयत्न करणे होय शेवटच्या क्षणाला अभ्यास करून यश मिळतेच असे नाही. दररोज थोडा-थोडा अभ्यास केल्यास विषय मनावर कोरले जातात. शिक्षक व पालक हे तुमचे मार्गदर्शक असून अपयशाची भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा असे आवाहन केले शेवटी पर्यवेक्षक श्री बनसोडे यांनी आभार मानले

फोटो

मालवण येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्योजक सागर वाडकर व मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक किट वाटप करण्यात आले त्याचे छायाचित्र

You cannot copy content of this page