Headlines

माठेवाडा येथे सुरू असलेल्या विकास कामांची सुधीर आडीवरेकर यांनी केली पाहणी..

योग्य पद्धतीने काम करा: ठेकेदारांना दिल्या सूचना..

सावंतवाडी, ता. १२ : सावंतवाडी शहरातील माठेवाडा परिसरात मुसळधार पावसादरम्यान ठेकेदाराच्या कथित चुकीच्या कामामुळे काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागला होता. या घटनेनंतर काही लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निष्काळजीपणाचा आरोप केला होता.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सुधीर आडीवरेकर आणि नगरसेविका दुलारी रांगणेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर संबंधित कामाची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आजपासून दुरुस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी घटनास्थळी जाऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम योग्य पद्धतीने आणि दर्जेदार व्हावे, तसेच भविष्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना दिल्या.
“कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व कामे नियमानुसार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत,” असे निर्देश आडीवरेकर यांनी यावेळी दिले.

You cannot copy content of this page