त्वरित बंदोबस्त करा:देवेंद्र टेमकर यांची वनविभागाकडे मागणी, निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी शहरातील माठेवाडा परिसरासह नाईकवाडा, कातळेवाडा,तसेच झिरंग रोड परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. माकडे, गवे, सांबर, बिबट्या आदी वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी सावंतवाडी वनविभागाकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा मोठा फटका बसत आहे. माकडांच्या टोळ्या घरांवर येऊन कौले फोडत असून, शिजवून ठेवलेल्या अन्नाचेही नुकसान करीत आहेत. तसेच गवे, बिबट्या आदी वन्यप्राण्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी सहानंतर या परिसरातील रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांवर शेती बंद करण्याची वेळ आली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माकडांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याचे नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांना सौरकुंपणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनी केली आहे. वन्यप्राण्यांपासून नागरिक व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.”
यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख श्री वैभव नाईक विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तालुकाप्रमुख राजू शेटकर, संदीप वेंगुर्लेकर, नियाज शेख
