आमची वाडी देऊळवाडी व पिंपळेश्वर युवक मित्रमंडळाचा पुढाकार; आकर्षक पारितोषिके

⚡बांदा ता.२६-: दिवाळीनिमित्त आमची वाडी देऊळवाडी आणि पिंपळेश्वर युवक मित्रमंडळ, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा श्री देव पिंपळेश्वर मंदिर परिसरात होणार आहे.
पिंपळेश्वर युवक मित्रमंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी आकाश सावंत, उपाध्यक्षपदी गौरव सावंत, खजिनदारपदी आशिष सावंत, तर सचिवपदी रोहन सुपल यांची निवड झाली आहे.
स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. बांदा मर्यादित गटात प्रथम क्रमांकासाठी १२ हजार ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ८ हजार ८८८ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ४ हजार ४४४ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या निमित्ताने दिवाळी स्पेशल लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक म्हणून वॉशिंग मशीन, द्वितीय पारितोषिक म्हणून रेफ्रिजरेटर, तर तृतीय पारितोषिक म्हणून कुलर देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य पाच आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. लकी ड्रॉ कुपनाची किंमत ५० रुपये असून, इच्छुकांनी ६ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आशिष सावंत 7058322706, गौरांक साळगावकर7058559216आणि देवेश वारंग7057568486 यांच्याशी संपर्क साधावा. दिवाळीनिमित्त आयोजित या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
