Headlines

आम्ही गप्प नाही, पहिला आवाज आम्हीच उठवला…

नगरसेवक बाबू कुडतरकर यांचा अँड. अनिल निरवडेकर यांना टोला : पत्रकार परिषदेवरून भाजपमध्ये दोन गट असल्याचे झाले सिद्ध तर त्या भ्रष्टाचारचा अजूनही विभागगिय चौकशी का होत नाही..?

⚡सावंतवाडी, ता. २६-: “आम्ही गप्प नाही, उलट नळपाणी योजनेच्या विषयावर पहिला आवाज आम्हीच उठवला. विशेष सभेच्या अहवालात ऑडिटरच उपस्थित नसतील, तर प्रश्न विचारायचे कोणाला? हा प्रश्न आम्ही सर्वप्रथम उपस्थित केला होता. त्यामुळे विशेष सभा घेऊन नेमके काय साध्य केले?” असा सवाल करत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी भाजपवर पलटवार केला. सावंतवाडी शहरातील नळपाणी योजनेच्या विषयावर उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना कुडतरकर बोलत होते.

ते म्हणाले की, उपनगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन नळपाणी योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. भाजपमध्ये दोन गट असल्याने त्यांच्यातच संवाद नसल्यामुळे उपनगराध्यक्षांना पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न जनतेसमोर मांडावे लागत आहेत, असा आरोप त्यांनी केला. नळपाणी योजनेच्या कामाबाबत विरोधकांवर टीका करण्यापेक्षा उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी नगराध्यक्षांसोबत एकत्र पत्रकार परिषद घ्यावी आणि योजनेबाबत असलेले सर्व प्रश्न जनतेसमोर मांडावेत, असा टोलाही कुडतरकर यांनी लगावला. नळपाणी योजनेच्या विषयावर आम्ही सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित करत आलो आहोत. पाणीपुरवठा विभाग चा भ्रष्टाचार आमचा शिवसेना महिला नगरसेविकानी उघडकीस आणला हे उपनगराध्यक्षनी विसरू नये तसेच त्या भ्रष्टाचारचा अजूनही विभागगिय चौकशी का होत नाही? याचे उत्तर जनतेसमोर स्पष्ट करावे
अशी मागणीही कुडतरकर यांनी केली.”

You cannot copy content of this page