Headlines

मालवण दांडी येथील फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध गटात शिवम म्हात्रे, आराध्य नाईक, नंदनी बिले प्रथम

मालवण (प्रतिनिधी) :

मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर मित्रमंडळ आणि आवारवाडी मित्रमंडळ दांडी मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत विविध वेशभूषांमध्ये सहभागी झालेल्या बालस्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. आकर्षक वेशभूषा, सादरीकरण आणि उत्साह यामुळे स्पर्धेत रंगत आली

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी विविध व्यक्तिरेखा आणि पारंपरिक वेशभूषांच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
अ गट प्रथम – शिवम म्हात्रे, द्वितीय क्रमांक – अन्वी कुबल, तृतीय क्रमांक – मैथिली गावकर,
उत्तेजनार्थ क्रमांक – देविका परब,
रिद्धांक्ष कामतेकर

ब गट प्रथम – आराध्य नाईक द्वितीय क्रमांक -दिव्या खवणेकर तृतीय क्रमांक – दिव्या केळुसकर
उत्तेजनार्थ क्रमांक – रेवा जोशी, सिद्धेश कामतेकर

क गट प्रथम – नंदनी बिले द्वितीय क्रमांक -प्राची जोशी तृतीय क्रमांक – जानव्ही परुळेकर, उत्तेजनार्थ क्रमांक – दीपक आयरे, सूरज लोणे

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री सुजाता शेलटकर आणि मूर्तिकार समीर वर्दम यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, विकी चोपडेकर, बाप्पा काळसेकर, मनीषा सोनवडेकर, अंजली पराडकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तसेच गरबा नृत्याच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष जांभरकर, लुईस फर्नांडिस
परेश वाघ, सुशांत शेलटकर, शैलेश शेलटकर, विशाल नागवेकर, हर्षद नागवेकर, अमित खरात, बाप्पा काळसेकर, उमेश हडीकर, ईशा गावकर, समीर गावकर, दर्शन गावकर, आवारवाडी मित्रमंडळ व श्री कृष्ण बेंजो पथक दांडी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे बालकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page