Headlines

महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात…

३ महिने पगारच नसल्याने २० जुलैपासून काम बंदचा इशारा:वेतन रखडल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ..

⚡कुडाळ ता.११-: येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील सेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या तब्बल ५२ कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन सोडाच पण ३१ मार्च २०२६ नंतरची त्यांची ऑर्डरच झालेली नाही. त्यामुळे येत्या देण्यात आलेले. त्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव येत्या २० जुलै पासून ‘काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आरोग्य ही महत्वपूर्ण सेवा आहे. सर्वांकडे दाद मागून सुद्धा आरोग्यासारख्या सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता आपली भवितव्याची चिंता लागून राहिली आहे. आरोग्य विभागाने कर्मचाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला असून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणी वालीच नाही अशी भावना कर्मचाऱ्या मध्ये निर्माण झाली आहे
कुडाळ महिला व बाल रुग्णालयात २0२२ पासून कर्मचारी ‘कुशल-अकुशल’ प्रकल्पांतर्गत रुग्णालयात २४ तास आरोग्य सेवा पुरवत आहेत, मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. चार कंत्राटदारा मार्फत कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात. मात्र या कंत्राटदारांकडून पगार देण्याबाबत गांभिर्याने घेतले जात नाही याचा मंत्रालय पातळी वरून गांभिर्याने विचार व्हायचा हवा, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या रुग्णालयात तंत्रज्ञ, नर्स, ब्रदर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ऑपरेशन थियेटर वॉर्ड बॉय असे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करतात. या रुग्णालयाची ओपीडी सुद्धा रोज १५० रुग्ण एवढी आहे. पण या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारच होत नाही हे मोठे दुखणे आहे आणि ताशा परिस्थितीही हे कर्मचारी सेवा बजावत आहेत.
​म्हणूनच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आज प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की ​थकीत वेतन आणि नवीन आदेश झाला नसल्याने ३१ मार्च २0२६ रोजी त्यांच्या कंत्राटाची मुदत संपली. त्यानंतर १ एप्रिलपासून ते आजपर्यंत लेखी आदेशाशिवाय काम करत आहेत. परिणामी, एप्रिल महिन्यापासूनचा तीन महिन्याचा आता जुलै मिळून चार महिन्याचा त्यांचा पगार पूर्णपणे रखडला आहे.
​ इतर लाभांपासून वंचित: कर्मचाऱ्यांना ईएसआयसी भविष्य निर्वाह निधी यांसारखे हक्काचे लाभ मिळत नाहीत. तसेच महिला कर्मचाऱ्यांना ‘मॅटर्निटी लीव्ह’ (मातृत्व रजा) देखील हक्काच्या पगारासह दिली जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच कंत्राटानुसार ठरलेली रक्कम आणि प्रत्यक्षात बँक खात्यात जमा होणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत असून, प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी वेळोवेळी केली आहे. पण त्या मागणीला केराची टोपली दाखवली जात आहे. ​”गेल्या चार वर्षांत आमचा पगार कधीही वेळेवर झालेला नाही. महागाईच्या या काळात घर चालवणे आणि रोज कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाचा खर्च करणेही आता कठीण झाले आहे. असे कर्मचाच्यांचे म्हणणे आहे
​या आंदोलनाच्या इशाऱ्यावर रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय वाळके यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत ३१ मार्च रोजी संपली असून, त्यापूर्वीच जानेवारी २0२६ मध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कालच झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत सध्याच्या एजन्सीला ३0 सप्टेंबर २0२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
​ दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक आणि पालकमंत्री चर्चेनुसार, सोमवारी अतिरिक्त आयुक्तांशी बोलून यावर तात्काळ अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मिळाले आहे.
​ प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले असून, लेखी आदेश प्राप्त होताच त्यांचे सर्व थकीत वेतन एजन्सीमार्फत एकत्रितपणे अदा केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतना अभावी हाल होत असल्याचे त्यांनी मान्य केले
आरोग्य सेवा ही महत्वाची सेवा असून कर्मचान्यांचा संपलेला करार करणे, त्याचे वेतन वेळेवर देणे हे आरोग्य विभाग व ठेकेदार यांची जबाबदारी असते. मात्र ही जबाबदारी पार पाडली जात नाही. त्यामुळे कर्मचाच्यावर पगाराविना काम करण्याची वेळ आली आहे. आपला संसार खर्च कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, यांनी या प्रश्नात जातीनीशी लक्ष घालून हा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page