Headlines

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.११-: शिष्यवृत्ती परीक्षा 2025- 26 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) प्रशालेचे एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून कु.यश सावंत याने तालुक्यातून बावीसवा व जिल्ह्यातून चौथीसवा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती संपादित केली तर पूर्व माध्यमिक परीक्षेत (इयत्ता आठवी) प्रशालेचे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून कु.करिष्मा मांजरेकर हिने तालुक्यातून तिसरा व जिल्ह्यातून पाचवा क्रमांक पटकावला तसेच कु.अथर्वी मांजरेकर हिने तालुक्यातून बारावा व जिल्ह्यातून चौथीसवा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती मिळवली.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर, सहाय्यक शिक्षिका श्रीम. प्रेरणा भोसले, श्रीम. फरजाना मुल्ला, श्री. योगेश चव्हाण,श्रीम.लविना आल्मेडा , श्रीम. साक्षी सावंत,श्री.गोविंद प्रभू, श्रीम. प्रणिता मयेकर या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page