Headlines

नरकासुर दहनावेळी झाडाला आग…

अग्निशमन बंबासाठी वेंगुर्ल्यावरून मदत:सावंतवाडी नगरपालिकेचा बंब सर्व्हिसिंगला; अग्निशमन व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांची नाराजी..

⚡सावंतवाडी ता.०८-: नरकासुराचे दहन सुरू असताना झाडाला आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास सावंतवाडी प्रांतकार्यालय परिसरात घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने आग विझविण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. मात्र, नगरपालिकेचा अग्निशमन बंब सर्व्हिसिंगसाठी दिल्याचे कारण देत वेंगुर्ला येथून बंब बोलविण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

सुदैवाने या आगीने मोठे स्वरूप धारण केले नाही. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. मात्र, शहरात आगीच्या घटना वारंवार घडत असताना अशा आपत्कालीन परिस्थितीत नगरपालिकेचा अग्निशमन बंब उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
सावंतवाडी शहराची वाढती व्याप्ती आणि आगीच्या घटनांची शक्यता लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा नेहमीच सज्ज असणे आवश्यक आहे. मात्र, बंब सर्व्हिसिंगला असल्याने दुसऱ्या शहरातून मदत मागवावी लागणे, ही बाब नगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.या प्रकाराची स्थानिक आमदारांनी गांभीर्याने दखल घेऊन नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचा आढावा घ्यावा आणि शहरासाठी कायमस्वरूपी सक्षम अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

You cannot copy content of this page