⚡वेंगुर्ले ता.०७-: जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड वेंगुर्ला आयोजित आणि महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब पुरस्कृत भव्य नरकासूर स्पर्धेला वेंगुर्ला येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

नरकासुराच्या भव्य प्रतिकृती, आकर्षक सजावट आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील पारंपरिक संस्कृती आणि उत्सवांची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ल्याचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक सचिन शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पारंपरिक उत्सवांचे जतन आणि संवर्धन होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
