वेंगुर्ला
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण परंपरेने प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील गणपती मंदिरात श्री गणपतीचे सायंकाळी “लक्ष्मीपूजन मुहूर्तावर” पूजन होणार आहे. लक्ष्मीपूजन दिवशी पूजन झाल्यानंतर होळी पौर्णिमेच्या आधी या गणपतीचे विसर्जन करण्यात येते, अशी येथील परंपरा आहे. गेल्या काही दिवसापासून गणपती आगमनाची लगबग सुरु असुन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा व ग्रामस्थ यांच्यावतीने शनिवारी सायंकाळी रात्री तयारी अंतिम टप्प्यात होती. सुमारे चार महिने येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात व यासाठी राज्यासह अन्य भागातूनही भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. वेंगुर्ला गोव्याकडे जाणाऱ्या मार्गांनजिक
उभादांडा मुख्य रस्त्यानजिक हे मंदिर वसले असुन दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे.

