Headlines

श्री.अविनाश पवार यांच्याकडे देवगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंता पदाची जबाबदारी…

कार्यभार स्वीकारताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव..

⚡देवगड ता.०७-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवगड उपविभागाच्या प्रभारी उपविभागीय अभियंतापदी कनिष्ठ अभियंता श्री. अविनाश विलास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना नुकतेच या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी देवगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या प्रभारी उपविभागीय अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
या नव्या जबाबदारीबद्दल देवगड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी वृंदाने श्री. पवार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री. प्रणव देसाई, कनिष्ठ अभियंता श्री. भानुदास निकाळजे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री. देविदास मोरे, श्री. नितीन पठारे, श्री. सतीश खोसे, वरिष्ठ लिपिक श्री. भीमसेन ढोके, श्री. सिकंदर सावंत, कनिष्ठ लिपिक श्री. आनंद झोरे, बंगला चौकीदार श्री. प्रकाश खरात, शिपाई श्री. गणेश पुजारे, श्री. अभिषेक ढोके आदींसह कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी श्री. पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग देवगड उपविभागातील सार्वजनिक बांधकामविषयक कामांना अधिक गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या नव्या जबाबदारीत त्यांना यश मिळो आणि त्यांच्या हातून उत्कृष्ट कार्य घडो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

You cannot copy content of this page