Headlines

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये अणसूर ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

वेंगुर्ला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असुन 50 लाख रुपये पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. ग्रामपंचायतच्या या अतुलनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये मिळालेले यश हे कोणा एकट्याचे नसून संपूर्ण गावाचे आहे. गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या मेहनतीचे यश आहे आणि विशेषत : गावातील महिला बहर संघातील सर्व पदाधिकारी, बचत गट महिला, बचत गट अध्यक्ष, कृषी सखी, पशुसखी, यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य झाले. तसेच गावातील तरुण मित्रमंडळ, सहकारी मित्र, गावासाठी लोकसहभागातून केलेली मदत ही सुद्धा हे अभियान यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान लाभले, अशी प्रतिक्रिया अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी दिली. आरोग्य विभागाचे अधिकारी, आरोग्य सेवक, आशा यांचे सुद्धा या अभियानासाठी फार मोठे योगदान लाभले.
या संपूर्ण प्रवासात जिल्ह्यातील, जिल्हा अधिकारी, मुख्यकार्यकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, यांचे सुद्धा फार मोठे योगदान लाभले.तसेच वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे , उपसभापती सचिन देसाई ,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक , सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, यांनी या अभियानात अथक मेहनत घेऊन फार मोठे सहकार्य केले. प्रत्येक घटकाचे या अभियाना मध्ये फार मोठे योगदान लाभले.
राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, सहकारी, वेंगुर्ला नगरपरिषद सर्व पदाधिकारी, कृषी विभागातील सर्व पदाधिकारी, वेंगुर्ला तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांचे सुद्धा फार मोठे योगदान लाभले. तसेच
पूर्ण प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, हायस्कुल मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचे बहुमोल असे योगदान मिळाले. अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य करून या यशात योगदान दिले.
तसेच या यशात ग्रामपंचायत टीमचा फार मोठा यशाचा वाटा आहे.
ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच, वैभवी मालवणकर, सदस्य सुधाकर गावडे, वामन गावडे, सीमा गावडे, प्रज्ञा गावडे,साक्षी गावडे, संयमी गावडे, कर्मचारी सुप्रिया गावडे, सोनू गावडे तसेच तन्वी गावडे, सिद्धेश गावडे, चिन्या गावडे,प्रथमेश गावडे,तसेच राजकीय क्षेत्रातील सहकारी, तालुक्यातील सर्व सरपंच यांचे सुद्धा फार मोठे योगदान लाभले, असे यावेळी बोलताना सरपंच सत्यविजय गावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page