जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे वितरण..

⚡बांदा ता.०७-: महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत आज इन्सुली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिसरातील शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य श्री. सदाशिव राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली, गुरुनाथ घाडी, गुरुनाथ पेडणेकर, सखाराम तावडे, रघुवीर देवूळकर, रामचंद्र कोठावळे, समीर सावंत, जयराम पालव, काका पालव, नाईक यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
शासनाच्या या उपक्रमामुळे जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, दुष्काळी परिस्थितीत पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
