संजू परब यांची मागणी:तर अँड अनिल निरवडेकर गप्प का…?
सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भिंत काढलेले गाळेधारक, पोट भाडेकरू तसेच प्रमिअम व भाड्याबाबतची यादी सर्वसाधारण सभेत सादर केली. यात 20 गाळेधारकांनी गाळ्यांची भिंत काढल्याचे प्रशासन सांगत आहे. याला आता 25 वर्ष झाली असून ऑडिट करून दंड वसूल केलाय. अशावेळी कारवाई करणं आवश्यक होतं. बैठकीत हा विषय घेऊन काय साध्य केलं ? प्रशासनान भिंती बांधून घेण आवश्यक होतं. मात्र, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर अभ्यासू असताना ते का गप्प राहिले ? पोटभाडेकरू नेमल्याची यादी असताना प्रशासन गप्प का ? ते गाळे ताब्यात घ्या, अनेक तरूण बेरोजगार आहेत, त्यांना ते द्या असे मत माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त करत नगरपरिषदेत पोरखेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. परब म्हणाले, गुरुवारी सर्वसाधारण सभेस मी उपस्थित नव्हतो. आमच्या नगरसेविकांनी प्रश्न मांडले. मात्र, काही गोष्टी जनतेसमोर आणण आवश्यक वाटत. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भिंत काढलेले गाळेधारक, पोट भाडेकरू तसेच प्रमिअम व भाड्याबाबतचा विषय आला. 20 गाळेधारकांनी भिंत काढल्याचे प्रशासन सांगत आहे. याला आता 25 वर्ष झाली. याचा ऑडिट करून दंड वसूल केला आहे. अशावेळी कारवाई करण आवश्यक होतं. बैठकीत हा विषय घेऊन काय साध्य केलं ? त्यांच्याकडून भिंती बांधून घेण आवश्यक होतं. बैठकीत उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर अभ्यासू असताना ते गप्प होते. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, ते का गप्प राहिले ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, भाडेकरूंना गाळे दिलेले असताना पोटभाडेकरू नेमल्याची यादी असताना प्रशासन गप्प का ? दुकान गाळे ताब्यात का नाही घेत ? ही यादी जाहीर करून काय साध्य केलं ? या गाळेधारकांना नोटीस काढलीय का ? आज अनेक तरूण बेरोजगार आहेत त्यांना ते गाळे द्या. ज्या भाडेकरुंना गाळे दिलेत ते पोट भाडेकरू नेमून २०-२० हजार भाड घेत असून नगरपरिषदेला दीड हजार भाड येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांत हिंमत असेल तर या भिंती बांधून घ्याव्यात अस आव्हान दिले.
दरम्यान, नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. पाणी पुरवठा सभापतींना क्लिनचीट दिली असं त्यांच्याकडून बोललं गेलं. एकदा चौकशी लागली की सभागृहाला हा अधिकारी आहे का ? निर्दोष असल्याचे नगराध्यक्षा सांगू शकतात का ? उपनगराध्यक्ष गप्प का राहिले ? चौकशी समिती नेमण्यात आल्याचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे राजीनामा मंजूर करावा, सभापती निर्दोष आहेत सिद्ध झाल्यास सभापतींना पुन्हा आणाव. सभागृहात काही विरोधी नगरसेवक पण क्लिनचीटला समर्थन करतात हे दुर्दैव आहे. नगरपरिषदेचा बाजार झालाय, आमचे सोडून एकही नगरसेवक अभ्यास करत नाहीत. वाटल्यास कुणीही चर्चेला याव आमनेसामने माझी तयारी आहे असा इशारा श्री. परब यांनी दिला. यावेळी नगरसेविका ॲड नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सुर्याजी आदी उपस्थित होते.
तसेच मुख्य रस्त्यावरील काल भरलेले खड्डे हे टेंडर न काढता भरलेत. टेंडर काढण्याआधी खड्डे भरण्याची ही पद्धत कुठली ? नगराध्यक्ष आदेश देऊ शकतात. पण, टेंडर काढूनच काम होण आवश्यक आहे. आता एक लाखाचं बील दोन लाख झालं तर जबाबदार कोण ? भ्रष्टाचाराची बोंबाबोंब होऊन सुद्धा आता दुसरा भ्रष्टाचार होत आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी वेडीवाकडी काम करू नयेत. मी कुणाचही ऐकणार नाही, हे शहर माझं आहे. नगराध्यक्ष म्हणून मी काम केलय आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. तसेच मोती तलावाच सुरू असलेल काम मला पसंत नाही. हा एक रोग असून त्याच मुळापासून उच्चाटन झालं पाहिजे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच लक्ष वेधणार आहे. तलाव हे सावंतवाडीच हृदय असून त्याला कॅन्सर झाला आहे. त्याच्या उपचारासाठी त्या पद्धतीचे डॉक्टर लागतील. आता सत्तेत असलेल्या डॉक्टरांना ते जमणार नाही. हे खोटी सर्टिफिकेट लावून डॉक्टर झालेत असा टोलाही त्यांनी लगावला.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीची दखल घेतली नाही : ॲड. नीता सावंत
दरम्यान, निर्दोष बोलण्याचा अधिकार सभागृहाला नाही. चौकशी समिती नेमली असताना असं विधान करणं, भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणण योग्य नाही. आमच्या नगरसेविकांनी ही बील रोखलीत. जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी आम्ही मागणी केली होती. या चौकशी समितीत मुख्याधिकारी यांना घेऊ नये असेही सांगितलं होतं. मात्र, त्या मागणीची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंची याबाबत आम्ही भेट घेऊ. यात केवळ जोडारीला बळीचा बकरा केला जातोय अस मत नगरसेविका ॲड. नीता सावंत कविटकर यांनी व्यक्त केले.
मंत्री उदय सामंत यांचे आभार : संजू परब
आडाळी एमआयडीसीसाठी इन्सुली सबस्टेशन ते आडाळी अशी 33 केव्ही लाईन टाकली जात आहे. ही लाईन बांदा शहरातून जात असल्याने होणारा धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी ती रोखली होती. यानंतर मी तेथील ग्रामस्थांशी भेट घेऊन चर्चा केली. मंत्री उदय सामंत यांची आम्ही भेट घेतली. यानंतर 3 किलोमीटरची लाईन अंडर ग्राउंड करण्यास मंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली आहे. तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो असं मत श्री. परब यांनी व्यक्त केले.

