Headlines

शीतल मांजरेकर यांच्या पुढाकारातून प्रभाग क्र. १० मध्ये स्वच्छता मोहीम

फुटपाथ मोकळे झाल्याने पादचाऱ्यांना दिलासा!

कणकवली : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील फुटपाथच्या बाजूला वाढलेले गवत आणि छोटी झुडपे यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. वाढलेल्या झुडपांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असतानाच पादचाऱ्यांचीही गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांकडून परिसर स्वच्छ करण्याची मागणी करण्यात येत होती.

नागरिकांच्या या मागणीची दखल घेत शीतल मांजरेकर यांनी पुढाकार घेऊन प्रभाग क्रमांक १० मधील फुटपाथच्या बाजूला ग्रास कटिंग करून घेतले. वाढलेले गवत आणि छोटी झुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे फुटपाथच्या बाजूचा परिसर मोकळा व स्वच्छ झाला असून पादचाऱ्यांना ये-जा करणे अधिक सोयीचे झाले आहे.

नागरिकांच्या छोट्या-मोठ्या समस्यांकडे लक्ष देत त्या प्रत्यक्ष कृतीतून सोडविण्याच्या दृष्टीने शीतल मांजरेकर यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे. नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page