Headlines

कोचरे विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदारांना डीव्हीडंट वाटप

वेंगुर्ला
कोचरे विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदारांना लाभांश ( डीव्हीडंट ) वाटप करण्यात आले. संस्था बरीच वर्षे अनिष्ट तफावतीत होती. संस्थेचे अध्यक्ष विष्णू उर्फ आप्पा फणसेकर यांनी सर्व सभासदांना व संचालकांना विश्वासात घेऊन आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत संस्थेची सुमारे 50 लाखाची अनिष्ट तफावत दूर करून मागील वर्षे संस्था नफ्यात आणले. या संस्थेने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. त्याचप्रमाणे संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव केला. कर्ज कर्ज वाटप त्याचबरोबर संस्थेने अनेक उपक्रम सुरू केले. सर्व थकबाकीदारांना विश्वासात घेऊन चेअरमन यांनी संस्थेचे सर्व थकबाकीदारांना व अनिष्ट तफावत ज्यांच्या कालावधीत झाले होते. त्यांच्याकडून ती भरून घेतली होती. आज संस्था स्वतःच्या पायावर उभी असून आठ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. सभासदानी मनीष दळवी यांच्याकडे इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. या संस्थेची धडपड पाहिली असून त्यांना नेहमी सहकार्य करणार असून या इमारतीला मनीष दळवी यांनी 50 हजाराचे देणगी जाहीर केली. त्याचप्रमाणे शासकीय योजनेतून इमारत बांधण्यासाठी सहकार्य करणार आहे, असे सांगितले. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. या कार्यक्रमाला पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, मच्छिमार नेते वसंत तांडेल, मेढा सरपंच अवधूत रेगे, व्हाईस चेअरमन म्हापणकर, सर्व संचालक व मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना नवी दिल्ली येथे महात्मा गांधी नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व लक्ष्मीची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांचे संस्थेच्या वतीने अध्यक्ष आप्पा फणसेकर यांनी आभार मानले. सभासदांच्या वतीने संस्थेने बऱ्याच वर्षानंतर लाभांशचे वाटप झाल्यामुळे सभासदांकडून संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page