⚡वेंगुर्ला ता.०७-: गेली अनेक वर्षे स्वत:च्या मालकीच्या इमारतीसाठी प्रयत्नशील असलेल्या खानोली ग्रामपंचायतीला मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध होत नव्हती. दरम्यान, खानोलकर आणि पाटकर कुटुंबियांनी यासाठी पुढाकार घेत आपली जागा उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायतीला स्वत:ची जागा उपलब्ध झाली असून नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा ३ नोव्हेंबर रोजी सरपंच सुभाष खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जि.प.सदस्य विजय नाईक, पं.स.सदस्य नितीन मांजरेकर, शितल राऊत, उपसरपंच सचिन परब, सदस्य सुनिल घाग, बाळकृष्ण मेस्त्री, रूपाली प्रभूखानोलकर, अमिता खानोलकर, प्रतिभा वरक, माजी सरपंच सीमा आवळेगांवकर, श्यामसुंदर मुणनकर, प्रणाली खानोलकर, विद्याधर प्रभू, महेश प्रभूखानोलकर, गाव पुरोहित बाबा जोशी, माजी उपसरपंच संजू प्रभू यांच्यासह सिद्धे·ार प्रभू, रामकृष्ण सावंत, प्रदिप सावंत, विलास सावंत, सुनिल सावंत, सदानंद मेस्त्री, ज्येष्ठ ग्रामस्थ भाई खानोलकर, तलाठी गभूड, ग्रामसेवक दीपक खानोलकर, कृषी विभागाचे जीवन परब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, सिद्धे·ार प्रभू, माजी ग्रामसेवक चेतन अंधारी, रूपाली प्रभूखानोलकर तसेच ग्रामपंचायतीला जागा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सुधाकर खानोलकर गुरूजी, सीमा आवळेगांवकर, प्रणाली खानोलकर, संजू प्रभू, विद्याधर प्रभू, तुषार खानोलकर आणि शामसुंदर मुणनकर यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणारे खानोलकर यांच्या कुटुंबातील तुषार खानोलकर याचा गावाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश प्रभूखानोलकर यांनी केले.
फोटोओळी – खानोली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन सरपंच सुभाष खानोलकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

