Headlines

पाळणेकोंड फाट्यावर सागवान तस्करी उधळली; तिघे संशयित वनविभागाच्या ताब्यात…

सावंतवाडी : कुणकेरी मधील पाळणेकोंड धरण फाट्यावर पहाटे वाहनाच पाठलाग करून तपासणी केली असता, विनापरवाना साग नगांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. हा माल शासकीय जंगलातील असल्याच्या संशय आल्याने मालासहित वाहन जप्त करून वनाधिकाऱ्यांनी विक्री आगारात आणून ठेवले आहे.

याप्रकरणी कुणकेरी येथील राजन लिंगू गावडे, योगेश परब व लाडू कुणकेरकर या तिघा आरोपींना वनविभागाने ताबेत घेतले असून याबाबत पुढील चौकशी कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप करीत आहेत. ही कार्यवाही सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहा.वनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुणकेरी वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप,वनरक्षक सदानंद मोहिते, अक्षय कुंभार या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page