Headlines

कोकिसरे पाझर तलावात तरुणाचा बुडून मृत्यू…

⚡वैभववाडी ता.१२-: कोकिसरे येथे मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरुणीचा कोकिसरे पालकरवाडी येथील पाझर तलावात बुडवून मृत्यू झाला सिद्धार्थ प्रकाश जाधव व वर्ष 22 सध्या राहणार मुंबई ज्यू मूळ नरडवे कणकवली ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ प्रकाश जाधव वय वर्ष 22 सध्या राहणार मुंबई गाव नरडवे कणकवली येथील तरुण आपल्या कोकिसेस येथील मित्रा सोबत असे 14 जण मित्र फिरण्यासाठी आले होते शनिवारी सकाळी ते कोकिसरे पालकरवाडी येथील पाझर तलावात अंघोळ करण्यासाठी गेले असताना सिद्धार्थ हा सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गायब झाला ही माहिती मित्राने गावकऱ्यांना दिली गावकरी श्रीराम शिंगरे आदींनी मित्रासमवेत पाझर तलाव परिसरातील जंगलात व आजूबाजूला त्याचा शोध घेतला. अखेर मित्रानी रात्री नऊच्या नंतर वैभववाडी पोलीस ठाणे येथे सिद्धार्थ जाधव बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही रात्रभर त्याचा शोध घेतला अखेर रविवारी सकाळी गावकरी मित्र व पोलीस यांनी परत तलावाच्या परिसरात शोध घेतला त्यानंतर कोकिसरे येथील दोन पाण्यात पोहणारे संदीप सावंत व दीपक पवार या दोघांना बोलवत पाण्यात उतरले पाण्यात शोध घेतला असता तो पाण्याच्या तळाला मृत्यू असल्याचे आढळून आले यावेळी त्याला त्याला पाण्या बाहेर काढण्यात आले पोलिसांनी घटनास्थळावरून पचनामा करून त्याला ग्रामीण रुग्णालय येथे शवाविच्छेदन ठेवण्यात आले आहे शवाविच्छेदन नंतर नातेवाईक आल्यानंतर त्याला नातेवाईका ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You cannot copy content of this page