⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ च्या शिष्यवृत्ती परिक्षेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.प्रमोदभाई कामत यांनी शाळेला भेट दिली. कु.पायल जयेश सावंत या मुलीचे शाल व भेटवस्तू देऊन कौतुक केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षण ,पालक यांचेही शाल देऊन कौतुक केले.
यावेळी नेतर्डे केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख सौ.दीपा गवस मॅडम ,शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष श्री.भास्कर सावंत,सदस्य श्री.एन.एल.सावंत,श्री.जयेश सावंत श्री.फटु सावंत , श्री.प्रसाद राऊळ,सौ.जिया सावंत,अंगणवाडी सेविका सौ.तन्वी सावंत श्रीम.शीला सावंत उपस्थित होते.श्री.प्रमोदभाई कामत यांनी शाळेत होणाऱ्या उपक्रमाबाबत सर्व शिक्षक व पालकांचे कौतुक केले.
डिंगणे नं.१ शाळेतील विद्यार्थिनीचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रमोदभाई कामत यांच्या कडून अभिनंदन…
