मालवणात वीर परिवार सहायता योजना माहिती सत्र संपन्न ..

⚡मालवण ता.०३-:
मालवण तालुका विधी सेवा समिती मालवण व वसुंधरा जनकल्याण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे वीर परिवार सहायता योजना माहिती सत्र संपन्न झाले. या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबित कुटुंबीय यांना मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) वीर परिवार सहायता योजना २०२५ प्रमाणे संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना कायदेविषयक बाबींमध्ये मोफत व सक्षम कायदेशीर सेवा प्राप्त होणेकरीता मालवण तालुक्यातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारास विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, मालवण व वसुंधरा जनकल्याण फाऊंडेशन मार्फत मालवण तालुक्यात सदर योजनेची अंमलबजावणी होण्याकरीता तसेच सदर योजनेची माहिती व मार्गदर्शन करणेकरीता दिवाणी न्यायालय, मालवण येथे या माहीती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक ॲड. सुमित जाधव, ॲड. अक्षय सामंत, ॲड. प्राजक्ता गावकर, ॲडm हेमेंद्र गोवेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुभेदार रमेश परब , सार्जंट गणेश बांदेकर, नायक बाळकृष्ण हडकर, लान्सनायक गुरुनाथ परब, सुनील आरोलकर (स्थलसेना) धनंजय सावंत (पीओ) , नरेश करलकर (स्थलसेना) , सुधीर लोंढे (स्थलसेना) , महादेव परब (स्थलसेना) , वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, उपाध्यक्ष ॲड. तारिका कुबल – चिंदरकर, विधी सेवा समिती मालवण वरिष्ठ लिपीक उमा मालंडकर, लिपीक मिलिंद जाधव, ॲड. रत्नदीप कदम, ॲड. प्रथमेश देसाई, वत्सला मणचेकर,संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

फोटो –

मालवण येथे आयोजित वीर परिवार सहायता योजना माहिती सत्रात मार्गदर्शन करताना ऍड. अक्षय सामंत, सोबत अन्य वकील व मान्यवर.

You cannot copy content of this page