⚡सावंतवाडी, ता.०३-:
सावंतवाडी राजघराण्यात आज आनंदाचा आणि उत्साहाचा मंगलमय क्षण अनुभवायला मिळाला. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत भोसले यांना गोंडस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
आज सायंकाळी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात ही प्रसूती सुखरूप पार पडली असून माता आणि बाळ दोघेही उत्तम प्रकृतीत असल्याची माहिती मिळाली आहे. या शुभप्रसंगी सावंतवाडी संस्थानाच्या विसाव्या पिढीचा उदय झाला असून, राजघराण्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या आनंदवार्तेची माहिती मिळताच राजघराण्याच्या हितचिंतकांसह सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सावंतवाडी शहरासह तालुकाभरात आनंदोत्सवाचे वातावरण असून, अनेकांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
राजघराण्यातील या शुभघटनेमुळे सावंतवाडीकरांमध्ये विशेष आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
सावंतवाडी राजघराण्यात चिमुकल्या युवराजाचे आगमन…
