श्री.मनीष दळवी यांच्या माध्यमातून मठ गावातील विकासकामांना गती…

⚡वेंगुर्ला ता.०३-: तालुक्यातील मठ हायस्कुल ते ठाकुरवाडी हा अंतर्गत रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते व दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी याची त्वरित दखल घेत मठ कार्यक्षेत्रातील त्वरित एकूण आठ विकासकामांची भूमिपूजने केली होती. त्यानुसार यातील 5 कामे सुरुवात झाली असून प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.यामध्ये मठ डॉ. रा
धों. खानोलकर हायस्कुल ते ठाकुरवाडी हा अंतर्गत रस्ता, संत लालाजी स्टॉप ते कणकेवाडी कडे जाणारा रस्ता, दक्षिण कणकेवाडी रस्ता, वडखोल लोपाद्रेश्वर मंदिर पर्यंत जाणारा रस्ता, गावडदेव गावडेश्वर मंदिर ते पलीकडच्या भागाकडे जाणारा रस्ता आदी कामे शासनामार्फत हाती घेण्यात आल्याने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांचे पालक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. मठ ग्रामपंचायत तसेच मठ ग्रामस्थांच्या मागणीची मनीष दळवी यांनी त्वरित दखल घेत शासन व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page