Headlines

बिळवस भोगलेवाडी येथील भोगले कुटुंबीयांना वैभव नाईक यांनी धीर देत केली मदत

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील बिळवस – भोगलेवाडी सडा येथील सुनील भोगले यांच्या घराला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत घरासह अंगणात उभी असलेली सहा वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेत भोगले कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. याची दखल घेत आज कुडाळ – मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी घटनास्थळी जाऊन भोगले कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. या संकटाच्या काळात भोगले कुटुंबाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मदत करण्यात आली.

या मदतीबद्दल भोगले कुटुंबीयांनी वैभव नाईक व शिवसेना पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मालवण तालुकासंपर्कप्रमुख दादा आंगणे, पंचायत समिती समन्वयक संतोष अमरे, मसुरे विभाग प्रमुख अमोल वस्त, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, कांदळगाव शाखाप्रमुख बाबली कांदळगावकर, सुजल भोगले, सुनील पालव, भावेश पालव, सचिन पालव, भाई माधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page