⚡सिंधुदुर्ग दि.२३-: कोकण परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार तसेच परिक्षेत्रीय आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंत्यांचा विचार करून बदली करण्यात आली आहे.
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे –
भरत गोविंद धुमाळ (सिंधुदुर्ग ते रत्नागिरी),
रमेश बामन तळवी (रायगड ते ठाणे ग्रामीण),
नागेश प्रकाश चिकणे (सिंधुदुर्ग ते रायगड),
शिवाजी तळपे (रायगड ते ठाणे ग्रामीण),
तानाजी बायगोडे (रायगड ते ठाणे ग्रामीण),
नितीन कदम (रत्नागिरी ते सिंधुदुर्ग).
संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
