Headlines

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांचे स्वागत प्रा. खान यांनी केले. विद्यार्थिनी पल्लवी सामंत हिने प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापकांना गुलाबपुष्प अर्पण करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. यावेळी प्रा. खान, प्रा. स्नेहा बर्वे आणि प्रा. मिलन सामंत यांनीही विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. विद्यार्थी जीवन नाईक, प्रज्ञा पवार, प्राची वेंगुर्लेकर, नमिता कदम यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षिता गावकर हिने केले, तर आभार खुशी सावंत हिने मानले. कार्यक्रमासाठी आकर्षक फलकलेखन धनश्री गावडे आणि सृष्टी कदम यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page