Headlines

नगराध्यक्ष दिलीप गिरप ….अन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य खुलले…..!

वेंगुर्ला
…..निमित्त होते वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनामार्फत आयोजित” रेन वॉटर हार्वेस्टिंग स्पर्धेचे”…. वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनमार्फत स्वामी विवेकानंद सभागृह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना …. बाबत स्पर्धा राबविण्यात आली होती. नगरपरिषद मार्फत स्पर्धा जाहीर केल्यानंतर शहरातील निवडक हायस्कूलनी तातडीने सहभाग घेऊन विविध मॉडेलस बनविली होती. याच दिवशी ठीकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव तसेच वेंगुर्ला नगरपरिषद सर्वसाधारण सभेचे आयोजन होते. दरम्यान व्यस्त कार्यक्रम असूनही वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी निवडक मॉडेल्स असूनही यावेळी सुमारे 45 ते 50 मिनिटे या प्रतिकृती पाहण्यासाठी वेळ दिला. यावेळी त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांशी अधिकाधिक व दीर्घवेळ देऊन संवाद साधला व विद्यार्थ्यांकरवी अधिकाधिक माहिती घेतली. यावेळी…… मात्र सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष बनलेले वेंगुर्ला नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळ याबाबत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आश्वासक भाव दिसून आले….! यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांविषयी व संबंधित प्रकल्पबाबत विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी अगदी शैक्षणिक स्तरासाठीही अधिक महत्त्व दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मंगलमय – आनंदमय वातावरण होते…. त्यामुळे आजही शहराच्या विकासासाठी अग्रेसर मानले जाणारे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या या जलद उपक्रमाबाबत शैक्षणिक स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले. दरवर्षी शासन स्तरावर वार्षिक विज्ञान प्रदर्शन संपन्न होते. परंतु शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या शासनाच्या योजना विद्यार्थ्यांमार्फत जनतेपर्यंत नेण्याच्या संकल्पनेचे विशेष कौतुक झाले. शासनास सहकार्यांबरोबरच शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अशाच प्रकारचे उपक्रम नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वारंवार राबवावेत, अशी भावनाही यावेळी व्यक्त झाली.

You cannot copy content of this page