Headlines

उगवे-गोवा महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने कारचा भीषण अपघात

महिला गंभीर, तिघे जखमी..

⚡बांदा ता.३१-: उगवे गोवा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिघेजण जखमी झाले आहेत. चालकाला वाहन चालविताना डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-०७-एजी-५७०२ क्रमांकाची कार कुडाळ येथून धारगळमधील आयुष रुग्णालयाकडे जात होती. कारमध्ये सुलक्षा मणेरीकर (वय ६३), चंद्रकांत मणेरीकर (वय ५८) आणि त्यांचा मुलगा सुशांत मणेरीकर (वय २८) हे प्रवास करत होते.
वाहन चालवत असताना चालक सुशांत मणेरीकर यांना अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारचा स्वअपघात झाला. या अपघातात सुलक्षा मणेरीकर या गंभीर जखमी झाल्या, तर चंद्रकांत मणेरीकर आणि सुशांत मणेरीकर यांनाही दुखापत झाली.
अपघातानंतर तिघांनाही तातडीने उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page