⚡बांदा,ता.३०-: बांदा पोलीस ठाणे हद्दीत गोवा येथून सावंतवाडी दिशेने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर बांदा पोलिसांनी कारवाई करून एकूण ₹8,22,300/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 30/07/2026 रोजी बांदा चेकनाका येथे वाहनांची तपासणी सुरू असताना MH-07-AS-6441 क्रमांकाची मारुती सुझुकी इको गाडी तपासण्यात आली. वाहनातील गोण्या ची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, V-1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला तसेच तुलसी रॉयल जाफरानी जर्दा असा गुटखा व तंबाखूजन्य माल आढळून आला.
कारवाईत सुमारे ₹3,22,300/- किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच ₹5,00,000/- किमतीची मारुती सुझुकी इको गाडी, असा एकूण ₹8,22,300/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 123 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री मोहन दहिकर तसेच मा अप्पर पोलीस अधीक्षक कु.नयोमी साटम , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो. Dysp श्री शेलार यांच्या नेतृवात सहा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे , GPSI गवस ,GPSI पवार, HC मुणगेकर WHC प्रसादी HC भोगले PC कापसे PC पाटील PC हिर्लेकर PC हळदे यांनी केली आहे.
