Headlines

सिंधुदुर्गच्या चार गुणवंत शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेत सन्मान…

सिंधुदुर्गनगरी ता ३०
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा आज जिल्हा परिषदेमार्फत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला

सन २०२३- २४ मध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून शासनामार्फत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी हे पुरस्कार प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हा परीषदेमार्फत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता . यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, अनुराधा नारकर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबाबत विभाग स्तरावरील “वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार” प्राप्त शेतकरी शरद गणपत धुरी (झाराप- कुडाळ), विभाग स्तरावरील “उद्यान पंडित पुरस्कार” प्राप्त शेतकरी उत्तम सूर्यकांत फोंडेकर (कुंभारमाट मालवण) यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच जिल्हास्तरावरील “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार “प्राप्त शेतकरी महेश रामदास संसारे (मागवली- वैभववाडी), आणि संतोष अंकुश गावडे (रानबाबुळी -कुडाळ), यांनाही आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर पुढील वाटचालीसाठी त्यांना आमदार निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page