भूषण बाक्रे यांना राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कार प्रदान…

पुणे येथील संस्थांच्या वतीने सन्मान.. कुडाळ : कुडाळ मधील एक अष्टपैलू कलाकार भूषण विलास बाक्रे यांना आज पुणे येथे झालेल्या शानदार समारंभात नृत्य गुरूंना दिला जाणारा राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कार २०१५ देऊन सन्मानित करण्यात आले.जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात शनिवारी सकाळी हा पुरस्कार वितरण…

Read More

आषाढीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी विठ्ठल मंदिरात शाळकरी चिमुकल्यांची “मांदियाळी”…

⚡सावंतवाडी ता.०५-: आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी येथील संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शाळकरी मुलांनी एक अभूतपूर्व ‘मांदीयाळी’ भरवली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषा करत दिंडी, पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यामध्ये माठेवाडा अंगणवाडीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या बालकांचाही सहभाग होता, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष…

Read More

शाळकरी मुलांना वारकरी ज्ञान मिळणे ही भाग्याची गोष्ट…

प्राथमिक शाळा वागदे डंगळवाडी नं. २ येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी संपन्न:शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.. ⚡कणकवली ता.०५-: आषाढी एकादशी निमित्ताने सध्या जिकडेतिकडे वारकरी लोकांचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. मात्र या कार्यक्रमाला शाळकरी मुलांकडून मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. शाळकरी मुलांना वारकरी ज्ञान मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका वेदिका चव्हाण यांनी…

Read More

जनतेच्या प्रश्नांना दिलासा: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण…

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना…

Read More

सिवर्ल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी पर्यटनमंत्री सकारात्मक…

बाबा मोंडकर :पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे वेधले लक्ष.. ⚡मालवण ता.०५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतराष्ट्रीय सिवर्ल्ड प्रकल्प चालू करण्यात यावा तसेच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात याव्यात अशा मागण्या भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी राज्याचे पार्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक असून याविषयी…

Read More

मेढा येथील शंकर मंदिरात आषाढी एकादशी उत्सव…

⚡मालवण ता.०५-:मालवण मेढा येथील श्री शंकर मंदिरात वार्षिक आषाढी एकादशी उत्सव दि. ६ व ७ जुलै रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशी दिवशी सकाळी ९ वाजता श्री कृष्ण मूर्तीची वाजत गाजत आगमन मिरवणूक काढून मूर्ती मंदिरात विराजमान करण्यात येणार आहे. यानंतर तारकर्ली, देवबाग, पाट यासह स्थानिक भजने होणार…

Read More

ठाकरे बंधू एकत्र आल्याने सावंतवाडीत सेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष

⚡सावंतवाडी ता.०५-: राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोममध्ये आज कार्यक्रम पार पडला. दोन ठाकरे बंधू तब्बल १९ वर्षांनी एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली. यानंतर सिंधुदुर्गात सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र…

Read More

उभादांडा येथे ११ हजार रुपयांचा गांजा जप्त…

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-बागायतवाडी येथे वेंगुर्ला पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये येथील प्रसाद प्रकाश तुळसकर (वय ३२) याच्या जवळ सुमारे ११ हजार रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. मुद्देमालासह पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. फोटोओळी – गांजाप्रकरण प्रसाद तुळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read More

शिरोडा वेळागरवाडी येथे घरफोडी…

५ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: शिरोडा-वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ५ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमान अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात…

Read More

“सिंधूदुर्ग कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाची जिल्ह्यात बाजी “…

“सिंधुदुर्ग कॉलेजची अर्थशास्त्र विभागाची चैताली कुणवळेकर जिल्ह्यात पहिली आणि लक्ष्मी पारकर दुसरी”.. मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील तृतीय वर्षी अर्थशास्त्र विषयामध्ये टी वाय बी ए या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चैताली कुणकवळेकर ही विध्यार्थीनी जिल्ह्यामध्ये ९.५८ ग्रेड घेऊन जिल्ह्यात पहिली तर लक्ष्मी पारकर ही विध्यार्थिनी ९.४३ ग्रेड घेऊन जिल्ह्यात दुसरी आलेली आहे….

Read More
You cannot copy content of this page