रोणापालमध्ये जोरदार प्रचार: नागरिकांचा देखील मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.०३-:
इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शावियर फर्नांडिस यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून रोणापाल परिसरात त्यांनी झंझावाती प्रचार सुरू केला आहे. घरोघरी जाऊन (डोअर टू डोअर) मतदारांशी थेट संवाद साधत असलेल्या फर्नांडिस यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शावियर फर्नांडिस हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले उमेदवार असून त्यांची नाळ सामान्य जनतेशी घट्ट जोडलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात सातत्याने कार्यरत असल्याने त्यांच्या कामाचा निश्चितच फायदा होत असल्याचे चित्र आहे. तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांमध्ये समाधान असून झेवियर फर्नांडिस यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
