Headlines

प्रशांत परब यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती…

जिल्हाप्रमुख संजू परब , रियाज खान यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान: पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन..

⚡बांदा ता.२७-: शिवसेना पक्षाच्या युवासेना संघटनेची सावंतवाडी तालुक्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रशांत परब यांची युवासेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजू परब, युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रियाज बशीर खान यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या आशीर्वादाने प्रशांत परब यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे सावंतवाडी तालुक्यात युवासेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नियुक्तीबद्दल प्रशांत परब यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

You cannot copy content of this page